We have revived this Information on What App Great Achievement we salute Joshi Family
[10:50 PM, 11/1/2016] +91 83086 53602: डबेवाली ते 'पेशवा'
‘डबेवाल्या जोशीकाकू’ म्हणून सुरुवातीला उपहासाने उल्लेख करणाऱ्या मराठी माणसांना दुबईतील ‘पेशवा’ रेस्टॉरन्टच्या यशाने खणखणीत उत्तर दिल आहे. रोज पहाटे ३ वाजता उठून १३५ डबे तयार करणाऱ्या श्रीया जोशी यांनी स्वकष्टाच्या बळावर शारजामध्येही दुसरं ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट सुरू केलं आहे. इतकंच नव्हे तर ‘निवांत’ नावाचा ‘स्पा’, भारतीय मसाल्यांची निर्यात आणि दुबईतच किराण्याचं दुकान.. अशी आजवर त्यांची कुटुंबीयांसह घोडदौड सुरू आहे..
रात्रीचे १० वाजायला आले होते. ‘पेशवा’ रेस्टॉरन्टमधील गर्दी आता कमी होऊ लागली होती. तेवढय़ात एक माणूस रेस्टॉरन्टमध्ये आला. एकदम साधा पेहेराव, पाहून वाटेल की बिल द्यायला तरी त्याच्याकडे पैसे आहेत की नाही! आला आणि त्याने पाच-सहा भाज्या, डाळ, रोटीचे प्रकार अशी बरीच मोठी ऑर्डर दिली आणि सांगितलं की, ‘‘बाहेर माझा ड्रायव्हर आहे, त्यालापण जेवणाचं विचारा.’’ जेवण झालं, बिल देताना त्याने विचारलं, ‘‘आता रेस्टॉरन्टमध्ये किती मुलं आहेत? एकाने सांगितलं बारा मुलं आहेत.’’ त्या माणसाने स्वत:चं बिल आणि प्रत्येक वेटरला २०० दरहॅम टिप दिली. ‘पेशवा’च्या स्टाफने एवढी टिप घ्यायला नकार दिला, पण त्याने ती घ्यायला लावली. एका मुलाने त्याला विचारलं की, ‘‘आपलं नाव काय, आपलं कार्ड द्याल का? कारण आम्हाला मॅडमना सांगावं लागेल.’’ तो म्हणाला, ‘‘तुम्ही गुगलवर बघा अमित पटेल नाव टाकून.’’ तो रेस्टॉन्टच्या बाहेर आला. बाहेर त्याची ‘एस ५०० मर्सिडीज’ उभी होती, युनिफॉर्म, डोक्यावर कॅप घातलेला ड्रायव्हर होता, तो त्या गाडीत बसून निघून गेला.
आम्ही गुगलवर पाहिलं तेव्हा समजलं की अमित पटेल ही व्यक्ती म्हणजे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत अशी आशियायी व्यक्ती! लंडनमध्ये ‘पेशवा’चं नाव, तेथील चविष्ट मराठी पदार्थाचे वर्णन, आदरातिथ्य ऐकलं आणि म्हणून दुबईत आल्यावर ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचा शोध घेत तो इथे आला. सर्व ऐकलं आणि मन समाधानाने भरून आलं. असे हे काही अविस्मरणीय प्रसंग असतात, जे मनाच्या कप्प्यात कायम राहतात. जगाच्या कानाकोपऱ्यात पोचणारं ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचं नाव आणि त्यामुळे शोधात येणारे ग्राहक याहून अधिक वेगळी पावती काय हवी? दुबईतील ‘पेशवा’ रेस्टॉरन्टची कर्तीधर्ती श्रीया सचिन जोशी.. आपल्या यशाच्या पायऱ्या समाधानाने उलगडत होती..
‘‘डबेवाल्या जोशीकाकू’ म्हणून सुरवातीला उपहासाने माझा उल्लेख करणाऱ्या मराठी माणसांना दुबईतील आमच्या ‘पेशवा’ रेस्टॉरन्टच्या यशाने दिलेलं हे उत्तर आहे,’’ अतिशय अभिमानाने श्रीया म्हणाली. मी म्हणाले, ‘‘तुझा डबेवाली ते ‘पेशवा’ची कर्तृत्ववान मालक हा प्रवास तरुण पिढीपुढे मोठा आदर्श आहे. डबेवाली काकू, बेबी सीटर, रिसेप्शनिस्ट, सेल्स वुमन, ट्रेडिंग अशा अनेक क्षेत्रांत स्वकर्तृत्वावर परदेशातसुद्धा यशस्वी होऊ शकते हे तू सिद्ध केलं आहेस.’’
श्रीया म्हणाली, ‘‘पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. वडील वकील होते पण उद्योगाचं वातावरण घरात नव्हतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सचिन जोशी यांच्याशी लग्न झालं. तो इंजिनीअर आहे. पैसे मिळवण्यासाठी आम्ही दोघं दुबईजवळच्या अजमान नावाच्या छोटय़ाशा इमिरेट्समध्ये आलो. सचिनची नोकरी सुरू झाली. सुरुवातीचे दिवस होते, पैशाची चणचण होतीच. ओळखीचे पवार काका एकदा आमच्याकडे जेवायला आले, त्यांना चव आवडली, त्यांनी डबा द्यायची विनंती केली आणि इथंच एक ‘डबेवाली’ जन्माला आली. घरगुती जेवण सगळ्यांनाच आवडतं तसं बघता बघता तब्बल १३५ डबे हळूहळू मी बनवून देऊ लागले. मुलगा लहान होता, घर लहान होते, पहाटे ३ वाजता उठून स्वयंपाकाला सुरवात करायची. दुपारी १२ वाजेपर्यंत डबे तयार व्हायचे. भर उन्हाळ्यात एसी चालायचे नाहीत, पण जिद्द होती, मेहनत करायची तयारी होती. तीन र्वष मी एवढे डबे बनवून देत होते. कसलीही लाज वाटत नव्हती. पण तरीही नात्यातले किंवा आजूबाजूचे ‘डबेवाली काकू’ म्हणून हिणवायचे तेव्हा खोलवर कुठे तरी टोचायचं. त्या वेळी मी पंचविशीसुद्धा ओलांडली नव्हती.’’
मी विचारलं, ‘‘म्हणूनच तुझी काही तरी करून दाखवायची जिद्द अधिकच वाढली का?’’ ती उत्तरली, ‘‘अगदी खरं आहे, म्हणतात ना ‘निंदकाचं घर असावं शेजारी.’ अशा या निंदकांमुळे आपली कसोटी पणाला लागते आणि त्या यशातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.’’
श्रीया सांगत होती, ‘‘त्याच वेळी सचिनची दुसरी नोकरी सुरू झाली ती शारजात. तिथून अजमानला डबे पोचवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मग मी छोटे-मोठे इतर पार्ट टाइम जॉब करायला सुरवात केली. रिसेप्शनिस्ट म्हणून. त्यानंतर सलग ५ र्वष एका शिपिंग कंपनीत मी काम केले. एकदा एका ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’ला गेले होते. तिथे निलोफर वालिया नावाची एक पारसी बाई नाशिक-पुणे रोडवर कसारा येथील प्लॉट्स विकत होती. आम्ही एक प्लॉट विकत घेतला. आमचा प्लॉट बघून आणखी ओळखीतून १० जणांनी प्लॉट्स घेतले. त्या बाईने मला कमिशन दिलं आणि तिच्यासाठी मार्केटिंग करण्याविषयी विचारले. भरपूर पैसे एकदम मिळाले होते, स्वत:च्या सोयीने काम करू शकत होते. जाण्या-येण्याची कटकट नव्हती, वेळेचं बंधन नव्हते. मी शिपिंग कंपनीची नोकरी सोडली आणि इथे पूर्ण वेळ देऊ लागले आणि ६ महिन्यांत ३५० प्लॉट्स विकले. नंतर मुंबई-पुण्यातील बिल्डर्ससाठी काम केलं. २००८-२००९ च्या सुमारास दुबई प्रॉपर्टीचं पुण्यात ‘सन अॅण्ड सॅण्ड’मध्ये एक्झिबिशन भरवलं. इतर कंपन्यांसाठी काम केलं.’’
डबेवाली, रिसेप्शनिस्ट, सेल्स वुमन अशा निरनिराळ्या भूमिका मी पार पाडल्या. प्रत्येक क्षेत्र भिन्न! पण त्यातून बरंच काही शिकता आलं, स्वयंपाकाच्या खाचाखोचांपासून ते समोर येणाऱ्या माणसाला पारखण्याची दृष्टी तल्लख झाली आणि या सर्वाचा फायदा मला ‘पेशवा’ सुरू करताना झाला. कितीही वेगवेगळी कामं केली तरी स्वयंपाकाची हौस मनामध्ये होतीच, फक्त संधीची वाट बघत होतो. सुदैवाने तशी संधी चालून आली. आमचे मित्र आनंद जोग यांनी रेस्टॉरन्ट चालू करण्यासाठी पुण्याचे डेक्कन जिमखान्यावरील जनसेवा भोजनालयाचे सचिन देवधर यांचं नाव सुचवलं. सचिन देवधरच्या आईने हे भोजनालय सुरू केलं होतं. ७० र्वष जुनं होतं. आनंद म्हणाला, ‘तुला स्वयंपाकातील कळतं पण रेस्टॉरन्ट कसं चालवायचं हे कळण्यासाठी सचिनचा ७० र्वष जुन्या रेस्टॉरन्टचा अनुभव उपयोगी पडेल.’ योग जुळून आला आणि सचिन देवधर, आनंद जोग आणि मी अशा तिघांनी मिळून रेस्टॉरन्ट सुरू केलं. सचिन देवधरने ‘पेशवा’ हे नाव सुचवलं आणि ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचा जन्म झाला..’’
‘‘आम्ही १६००/१७०० चौरस फुटांची जागा बघत होतो, पण जी जागा आम्हाला पसंत पडली ती होती ४५०० चौरस फुटांची. हे सर्वच दृष्टीने जास्त होते. कारण एवढी जागा म्हटल्यावर तेवढं भाडं, आतील सजावट, सामान आणि कामगार. सर्व गोष्टी वाढणार होत्या, पण आनंदने सल्ला दिला की मोठंच रेस्टॉरंट काढू या आणि अखेर २०१२ मध्ये सर्व सोपस्कार पूर्ण होऊन ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट सुरू झालं. पंजाबी, गुजराती जेवण तर ठेवायचं नव्हतं. फक्त महाराष्ट्रीय, मराठी जेवण ठेवायचं होतं, पण मग नुसतं ब्राह्मणी ठेवूनही चालणार नव्हतं म्हणून मग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतांतील जेवण ठेवायचं ठरवलं. जसे नागपुरी, कोल्हापुरी, वऱ्हाडी, मालवणी, कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी! आज आमचा सर्व मिळून स्टाफ ५५ जणांचा आहे. सचिन देवधरने सर्व स्टाफला पुण्याला प्रशिक्षण दिलं आहे. सचिन देवधरची आई दोन महिने पुरणपोळी आणि उकडीचे मोदक सर्व मुलांना शिकवत होती. आज दुबईतच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ‘पेशवा’च्या पुरणपोळ्या पोहोचल्या आहेत. उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेणं शेवटी आम्हाला बंद करावं लागतं. ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी भरलेलं आहे. आज मराठी लोक तर येतातच पण अमराठी लोकांची संख्याही खूप असते.’’
‘पेशवा’ हे नावाप्रमाणंच अस्सल मराठी संस्कृती, मराठी परंपरेचं प्रतीक आहे. दुबईच्या वाळवंटातही आपली परंपरा जतन करून त्याची पाळंमुळं जगभर पसरवत आहे. महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ हे तर प्रमुख वैशिष्टय़ आहेच, पण त्याचबरोबर मराठी राज्याचं पेशवेकालीन वातावरण, त्याला साजेलसं मराठी संगीत आणि सणावारी चांदीच्या ताटवाटीत बसणारी पंगत अमराठी लोकांनासुद्धा अतिशय भावते. मराठी संस्कृतीत सणांची परंपरा फार मोठी आहे. दहीहंडी, गुढी पाडवा, गणपती, दिवाळी, संक्रांत हे सर्व आपले प्रमुख सण. ‘पेशवा’त दहीहंडी बांधून गोपाळकाला होतो. गुढी उभारून पूजा करून गुढी पाडवा साजरा होतो. पाच दिवसांचा गणेशोत्सव होतो. सकाळ-संध्याकाळ दुबईच्या वाळवंटात टाळ्या आणि झांजाच्या गजरामध्ये गणरायाच्या आरत्या होतात, सहस्रावर्तनं होतात, महाप्रसाद होतो.
दीपावलीत दिव्यांच्या रोषणाईने ‘पेशवा’रेस्टॉरन्ट सजतं, संथपणे तेवणाऱ्या पणत्यांच्या रांगा आणि मनमोहक रंगांनी शोभणाऱ्या रांगोळ्या, आकाशकंदील, दारावरची आंब्याची तोरणं आणि फराळांनी भरलेली ताटं! आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर आलेल्या सर्व भारतीयांना इथे सणांचा आनंद मिळतो आणि नात्यांचं प्रेम मिळतं. खरोखरच ‘पेशवा’ हे नाव सार्थ ठरलं आहे.
दर वर्षी आम्ही ‘पेशवा सन्मान पुरस्कार’ देतो. यूएईमध्ये राहून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी माणसाला हा पुरस्कार देतो. भारतातून आलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. घरादाराला सोडून, पैशांसाठी दुबईच्या वाळवंटात वर्षांनुर्वष वास्तव्य करणाऱ्या मराठी लोकांच्या, भारतीयांच्या जेवणात थोडा तरी आनंद फुलवण्याचा प्रयत्न ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट करते.
इथे पूजेचा स्वयंपाक हा वेगळ्या पातेल्यातून, वेगळ्या जागेत होतो आणि त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर श्री सत्यनारायण पूजा, गणपती पूजा अशा सर्व पूजांच्या प्रसादाच्या जेवणांची ऑर्डर लोक अतिशय विश्वासाने देतात. महाशिवरात्रीला उपवासाची थाळी मिळते. रेस्टॉरंट सुरू झाल्यापासून दररोज तयार होणाऱ्या प्रत्येक पदार्थाची चव मी, सचिन किंवा ओंकार घेतो आणि नंतरच पदार्थ थाळीत येतो. एवढं करूनही एखादी तक्रार येते- तिखट आहे किंवा मीठ कमी आहे, पण सर्वसाधारणपणे सर्वाना, अमराठी लोकांनासुद्धा ‘पेशवा’ रेस्टॉरंटचं जेवण, वातावरण, आदरातिथ्य आवडतं.’’
‘‘इथे दुबईत बलदियाचे म्हणजेच म्युन्सिपालटीचे नियम अतिशय कडक आहेत. वारंवार अधिकारी येऊन तपासणी करतात. इथे व्हेज-नॉनव्हेज बनवण्यासाठी काउंटर्स वेगळे असतात, भांडी, सुऱ्या, काटे, चमचे, इतकेच काय पण बेसिनसुद्धा वेगळी असतात. शाकाहारी पदार्थाना वेगळे आणि मांसाहारीला वेगळे, तर माशांसाठी आणखी वेगळे! सर्व नियम तुम्हाला पाळावेच लागतात. नाही तर खूप मोठा दंड बसतो किंवा रेस्टॉरंट बंदसुद्धा ठेवावं लागतं. किचनमधील सर्व टाइल्स चांगल्या असल्या तरी दोन वर्षांनी बदलाव्या लागतात. ड्रेनेज सिस्टीम, गार्बेज व्यवस्था याबाबतीत अतिशय कडक नियम आहेत. इतकी स्वच्छता भारतात कुठेही दिसत नाही.’’
‘‘ ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट हे आमचं एक कुटुंब आहे आणि म्हणूनच या कुटुंबाच्या सदस्यांची सुखदु:खंही वाटली जातात. मराठी कामगारवर्गाला गटारी अमावास्येचं नेहमीच आकर्षण असतं. हे लक्षात घेऊन तीही साजरी केली जाते, पण प्रत्येक मुलगा अतिशय जबाबदारीने वागतो आणि गटारी साजरी होते. मला असं वाटतं की स्टाफबरोबर नातं जर कौटुंबिक ठेवलं तर त्यांना कामाला स्फूर्ती मिळते, आपलं घरचं कार्य या भावनेने ते काम करतात आणि मग ते नोकरीत टिकून राहतात. आमच्याकडचा बहुतेक सर्व स्टाफ दोन वर्षांचा व्हिसा रिन्यू करून नोकरी करत आहे.’’
‘‘अर्थात त्याला अपवाद एक उदाहरण घडलं. आमच्या ‘स्पा’मध्ये एक मराठी मुलगी काम करत होती. ती सारखी विनवण्या करत होती, हातापाया पडून सांगत होती की माझ्या नवऱ्याला ‘पेशवा’ रेस्टॉरन्टमध्ये नोकरी द्या. तो सर्व काम नीट करेल. त्याला तिकडे नोकरी नाही, घरात खाणारी तोंडं बरीच आहेत, खूप उपकार होतील. मराठी माणसाला मदत होईल, या हेतूने पुरेसा स्टाफ असतानासुद्धा आम्ही तिच्या नवऱ्याला व्हिसा दिला आणि इथे आणलं. ४/६ महिने त्याने चांगले काम केलं आणि नंतर एक दिवस सांगू लागला की मला एका कॅफेमध्ये जास्त पगार मिळतो आहे, मी नोकरी सोडतो. मी सांगितलं, ‘‘तू आमचे व्हिसाचे पैसे दे आणि जा किंवा दोन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून जा. त्याने सरळ ‘लेबर’मध्ये जाऊन तक्रार केली. त्याला आमचे व्हिसाचे पैसे द्यावे लागलेच पण आम्हाला मनस्ताप खूप झाला.’’
‘‘ ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट आता उत्तम प्रकारे चालू लागलं आहे. शारजामध्ये त्याची दुसरी शाखा उघडली आहे. तेही हळूहळू स्थिरस्थावर होत आहे. त्यामुळे आणखी काही वेगळं सुरू करावं ही इच्छा होती. अचानक एक योग जुळून आला आणि आम्ही ‘निवांत’ या नावाने ‘स्पा’ सुरू केला. खरं तर आम्हाला फॅमिली स्पा सुरू करायचं होतं, पण फक्त लेडीज स्पासाठी परवानगी मिळाली.’’
‘‘त्याबरोबर आता जनरल ट्रेडिंगचं लायसन्स मिळालं आहे. त्यामुळे ट्रेडिंगही सुरू केलं आहे. आफ्रिका आणि इराणला भारतीय मसाले, इतर पदार्थ निर्यात करतो. तसेच सचिन इंजिनीिरगच्या वस्तूंची निर्यात करतो. दुबईतच किराण्याचं दुकानही सुरू केलं आहे. हे सर्व नवीन व्यवसाय बाल्यावस्थेत आहेत, पण मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यायचा, त्यासाठी मेहनत करायची, हे आम्हा पती-पत्नीचं आयुष्याचं सूत्र आहे.’’
२०१३ मध्ये ‘गल्फ मराठी बिझनेस फोरम’ने श्रीयाला पुरस्कार देऊन गौरविलं. श्रीया म्हणाली, ‘‘या पुरस्काराचा वाटेकरी माझा नवरा सचिन आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने मला जी साथ दिली त्यामुळेच ‘डबेवाली’ते ‘पेशवा’ ची मालक तुम्हाला दिसत आहे. ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचं श्रेय हे माझा नवरा सचिन आणि माझं एकत्रित आहे!’’ श्रीया अतिशय अभिमानाने हे बोलत होती.
मी श्रीयाला म्हटलं, ‘‘एक मराठी म्हणून सर्व मराठी दुबईकरांना तुमचा अभिमान वाटतो की ‘पेशवा’ रेस्टॉरंटच्या माध्यमातून मराठी पदार्थ तुम्ही भारताबाहेर नेलेत. लोकप्रिय केलेत.’’
मेघना वर्तक

No comments:
Post a Comment